मोठी बातमी : मराठी लोकांसमोर राज्यपाल झुकले ! माफी मागितली

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतील गुजराती आणि राजस्थानी समाजाचे कौतुक करतांना मराठी माणसांचा अपमान केल्या प्रकरणी संपूर्ण राज्यभरात उसळलेला तीव्र जनक्षोभ पाहून अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माफी मागितली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजस्थानी आणि गुजराती मुंबईतून निघून गेल्यानंतर इथे काहीच राहणार नसल्याचे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली होती. यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सर्वसामान्यांनी मोठ्या प्रमाणात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. हा मराठी लोकांचा अपमान असल्याचा आरोप केला होता. तर यावर राज्यपालांनी केवळ सारवा-सारव करणारे वक्तव्य करून सर्वांचा रोष ओढवून घेतला होता.

दरम्यान, कालच संजय राऊत यांना केलेली अटक ही राज्यपालांच्या मुद्यावरून लक्ष हटविण्यासाठी असल्याचा अनेक नेत्यांनी आरोप केला होता. या पार्श्‍वभूमिवर, आज सायंकाळी भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली आहे. या संदर्भातील एक लेखी निवेदन त्यांनी जारी केले आहे.

Protected Content