Home Cities जळगाव विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. विनोद पाटील

विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. विनोद पाटील

0
126

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रजिस्ट्रार अर्थात कुलसचिवपदी डॉ. विनोद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून या माध्यमातून विद्यापीठातील प्रभारी राज संपुष्टात आले आहे.

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे रजिस्ट्रारपद सध्या प्रभारी या प्रकारातील असून याचा प्रभार हा डॉक्टर किशोर पाटील यांच्याकडे होता. गेल्या काही दिवसांपासून रजिस्ट्रारपदाची निवड प्रक्रिया सुरू होती. या पदासाठीच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या होत्या. यात मुंबई विद्यातीठात केंद्रीय मूल्यमापन प्रकल्प पदावर कार्यरत असणारे डॉ. विनोद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

डॉ. विनोद पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील असून आता विद्यापीठाच्या रजिस्ट्रारपदाची धुरा त्यांच्याकडे येणार आहे. आधी कुलगुरू आणि नंतर प्र कुलगुरू पदांची नियुक्ती झाल्यानंतर आता रजिस्ट्रारपदाची नियुक्ती झाल्याने विद्यापीठातील प्रभारी राज संपुष्टात आले आहे.


Protected Content

Play sound