Home क्राईम भडगाव पोलिसांची मोठी कारवाई; सोलर प्लांटमधील कॉपर केबल चोरीप्रकरणी ९ जण जेरबंद,...

भडगाव पोलिसांची मोठी कारवाई; सोलर प्लांटमधील कॉपर केबल चोरीप्रकरणी ९ जण जेरबंद, ९.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
5

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  भडगाव तालुक्यातील सोलर प्लांटमधून कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीचा भडगाव पोलिसांनी पर्दाफाश करत ९ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ₹९ लाख ५५ हजार ४०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, जिल्ह्यातील इतर चोरीच्या घटनांचाही तपास सुरू आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी भडगाव पोलीस ठाण्यात सोलर प्लांटमधील कॉपर केबल चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

अटकेत असलेल्या आरोपींकडून सुमारे ४ हजार मीटर कॉपर वायर, एक कटर, ८ मोबाईल फोन, एक प्लॅटिना दुचाकी तसेच एक स्प्लेंडर दुचाकी असा एकूण ₹९.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत – जानकीराम भगवान मोरे (२२), रवी सोमा भिल (२२), सुका संजय भिल (१९), अनिल अर्जुन भिल (२७), शुभम सुरेश भोंड (२३), योगेश दिगंबर भिल (२०), संजय नारायण सोनवणे, आदिल शेख शफीक मणियार (४८) आणि जितू यशोनाथ पवार (२०). सर्वजण इंदिरा नगर, शिरसोली, ता. जि. जळगाव येथील रहिवासी आहेत.

या आरोपींकडून जिल्ह्यात इतर ठिकाणीही अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली असून, त्या अनुषंगाने पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश टाक व त्यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ. गोवर्धन बोरसे करीत आहेत.


Protected Content

Play sound