भडगाव नगरपरिषदेचे असे असेल आरक्षण !

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी दुसर्‍या टप्प्यात असलेल्या भडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

भडगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग निहाय आरक्षण सोडत कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज सभागृहात उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यात नगरपालिकेच्या २४ जागांपैकी अनुसूचित जातीकरिता १ जागा, अनुसूचित जमाती करीता २ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग ६ तर उर्वरित १५ जागा सर्वसाधारण प्रवर्गा करिता उपलब्ध झालेल्या आहेत. यातील उर्वरित जागा या आधीच आरक्षीत असल्याने ओबीसी आरक्षण सोडतीबाबत २४ पैकी ६ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यातून खालील प्रमाणे आरक्षण निश्‍चीत करण्यात आले.

भडगाव पालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे आहे

१ – अ- अनुसूचित जमाती महिला ब- सर्वसाधारण
२ – अ- सर्वसाधारण महिला ब- सर्वसाधारण
३ – अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब- सर्वसाधारण
४ – अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग ब- सर्वसाधारण महिला
५ – अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब- सर्वसाधारण
६ – अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग ब- सर्वसाधारण महिला
७ – अ- सर्वसाधारण महिला ब- सर्वसाधारण
८ – अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग ब- सर्वसाधारण महिला
९ – अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब- सर्वसाधारण
१० – अ- सर्वसाधारण महिला ब- सर्वसाधारण
११ – अ- अनुसूचित जाती ब- सर्वसाधारण महिला
१२ – अ- अनुसूचित जमाती, ब- सर्वसाधारण महिला

दरम्यान, या आरक्षणावर माजी नगरसेवक सचिन चोरडिया यांनी आक्षेप घेतला आहे.

Protected Content