खा. उन्मेष पाटलांनी हुतात्मा जवानाच्या कुटुंबाचे केले सांत्वन

भडगाव प्रतिनिधी | येथील टोणगाव भागातील रहिवासी निलेश रामभाऊ सोनवणे यांना लेह-लडाखमध्ये वीरगती प्राप्त झाली असून आज खासदार उन्मेषदादा पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

याबाबत वृत्त असे की, टोणगाव भागातील रहिवासी असलेले निलेश रामभाऊ सोनवणे यांना नुकतीच लेह-लखाडमध्ये वीरगती प्राप्त झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यसंसस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आज हुतात्मा जवानाच्या घरी सांत्वनपर भेट दिली.

याप्रसंगी शहीद जवान यांचे बंधू पोलीस रावसाहेब सोनवणे , पोलीस बाळासाहेब सोनवणे यांचे सांत्वन करीत खासदार उन्मेश दादा पाटील यांनी त्यांना धीर दिला. यावेळी आई लाह्याबाई सोनवणे यांच्या आक्रोशाने वातावरण गंभीर झाले होते. खासदारांनी त्यांचे सांत्वन केले. वीर जवान निलेशजी यांच्या हौतात्म्याला त्यांनी वंदन केले.

याप्रसंगी भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, सरचिटणीस गोविंद शेलार, भडगावचे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ आबा पाटील, फौजी आबासाहेब गरुड, अनेक माजी सैनिक, युवा मोर्चा चे शैलेश पाटील, रवी आबा राजपूत, भाजपचे बापू शार्दुल, भूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: