भडगाव प्रतिनिधी– शहरातील यशवंतनगर भागात झालेल्या चोरी प्रकरणी एलसीबीच्या पथकाने तिघांना अटक केली आहे.
भडगावातील यशवंतनगर भागात अर्जून भिल्ल यांच्याकडे ९ डिसेंबरला घरफोडी झाली होती. त्यात सुमारे ८ हजार ५०० मुद्देमाल चोरांनी लांबवला होता. या चोरीच्या घटनेतील तीन संशयितांनी एलसीबीच्या पथकाने सुनील परशुराम पवार (वय २२), अनिल विरभान सूर्यवंशी (वय २७), विजय प्रकाश घोडेस्वार (वय १९) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७ मोबाइल आणि चार हजार रुपये रोख हस्तगत केले आहे. संशयितांना भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई सहाय्यक फौजदार अशोक महाजन, हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, पोलिस नाईक रणजित जाधव, नंदलाल पाटील, किशोर राठोड, भगवान पाटील, ईश्वर पाटील, उमेश गोसावी, विनोद पाटील, श्रीकृष्ण देशमुख, चालक पवार यांच्या पथकाने केली आहे.