वाडे येथील जवानाचे निधन : उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वाडे येथील रहिवासी तथा सीआयएसएफमध्ये कार्यरत असणार्‍या मनोज लक्ष्मण चौधरी या जवानाचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.

तालुक्यातील वाडे येथील रहिवाशी व दिल्ली फरीदाबाद येथे ( सीआयएसएफ ) सेंट्रल इंडस्स्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स मध्ये देशसेवा बजावत असलेले जवान मनोज लक्ष्मण चौधरी वय ३५ वर्ष यांचे दिल्ली येथे उपचार घेत असतांना दुखद निधन झाले. ही घटना दि. २२ रोजी राञी ८ वाजता दिल्ली येथे घडली. या घटनेने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे. या जवानाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन दिल्लीहुन विमानाने औरंगाबाद येथे मृतदेह आणणार आहेत. औरंगाबादहुन वाडे गावी अँम्बुलन्सने या जवानाचा मृतदेह आणणार आहेत. दि. २४ रोजी वाडे येथे वाघळी रस्त्यालगत शेतात या जवानाच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रशासनासह नातेवाईक मंडळींकडुन मिळालेली आहे.

दरम्यान, वाडे येथे तरुण मंडळी, ग्रामस्थांमार्फत अंत्यसंस्कारासाठी नियोजन सुरु आहे. वीर जवान मनीष चौधरी हे वाडे येथील रहिवाशी व जि. प. विभागाचे सेवानिवृत्त लिपीक लक्ष्मण ओंकार चौधरी यांचे लहान चिरंजीव होत. सुमारे नऊ वर्षांपासून ती सीआयएसएफमध्ये कार्यरत होते. सध्या ते दिल्ली फरीदाबाद येथे सध्या सेवा बजावत होते. दि. २२ रोजी राञी ८ वाजेच्या सुमारास जेवण करुन थोडा आराम करुन फरीदाबाद येथे डयुटीवर जाणार होते. तोच क्रुर काळाने त्यांचेवर घाला घातला. त्यांना दिल्ली येथील दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले.

दि. २४ रोजी सकाळी ९ वाजता वाडे गावालगत वाघळी रस्त्याला लागुन शेतात या जवानाच्या पार्थीवावर अंत्यसस्कार शासकीय इतमामात केले जाणार आहेत. या जवानाच्या पश्चात वडील, आई, भाऊ, पत्नी, ३ वर्षाची मुलगी असा परीवार आहे. अंत्यसंस्कारासाठी भडगाव पोलीस स्टेशनमार्फत पोलीस बंदोबस्त लावलेला आहे.

Protected Content