निलेश पाटील यांना उत्कृष्ट आरोग्य कर्मचारी पुरस्कार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव येथील आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असलेले व मूळ रावेर तालुक्यातील पातोंडी गावातील रहिवासी निलेश सुखदेव पाटील यांना आज नाशिक येथे उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जळगाव जिल्ह्यातील आरोग्यसेवक यांचे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांच्या कामाचे मूल्यांकन करण्यात आले होते. यात प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव तालुका जळगांव येथील आरोग्यसेवक म्हणुन सेवारत असलेले निलेश सुखदेव पाटील यांना सन २०२३ – २४ साठी उत्कृष्ट कर्मचारी या पुरस्कारासाठी पात्र ठरल्याने त्यांना आज १५ ऑगस्ट या ७८ व्या स्वातंत्र्यदिनी नाशिक येथे डॉ. कपिल आहेर, उपसंचालक, आरोग्य सेवा,नाशिक मंडळ, नाशिक व डॉ. विवेक खतगांवकर, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा हिवताप नाशिक यांचे हस्ते उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला.नाशिक विभागातून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. याबाबतीत त्यांना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तुषार देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय सपकाळ, डॉ. अभिषेक ठाकुर तसेच आरोग्य सहाय्यक धनराज सपकाळे व राजेंद्र बारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content