Home क्रीडा बेंगळुरूची किंग्ज इलेव्हनवर मात

बेंगळुरूची किंग्ज इलेव्हनवर मात

0
47

बेंगळुरू वृत्तसंस्था । एबी डिव्हिलीयर्सच्या दणकेबाज फलंदाजीच्या जोरावर आरसीबी संघाने किंग्ज इलेव्हनचा १७ धावांनी पराभूत केले.

चिन्नास्वामी स्टेडियमवरील या सामन्यात धावांचा पाऊस पहायला मिळाला. आरसीबीने निर्धारित २० षटकांत ४ बाद २०२ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार विराट कोहली, पार्थिव पटेल, मोईन अली व आकाशदीप नाथ लवकर बाद झाल्यामुळे नवव्या षटकात आरसीबीची ४ बाद ८१ अशी स्थिती झाली होती. त्यानंतर डिव्हिलियर्स आणि मार्कस स्टोइनिस यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी ६६ चेंडूंत १२१ धावांची भागीदारी केली. डिव्हिलियर्सने ४४ चेंडूंत ३ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ८२ धावांची, तर मार्कसने ३४ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ४६ धावांची खेळी केली. यामुळे आरसीबीने तब्बल २०२ धावा केला.

दरम्यान, आरबीसीने दिलेल्या २०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या ख्रिस गेल आणि लोकेश राहुल या दोघांनीही पहिल्यापासूनच फटकेबाजी केली. लोकेश राहुलने २७ चेंडूत ४२ धावा केल्या तर गेलने १० चेंडूत २३ धावा काढल्या. ही जोडी बाद झाल्यावर आलेल्या डेव्हिड मिलर आणि निकोलस पूरन यांनी चांगली भागीदारी केली. मात्र त्यांचे प्रयत्न अपूर्ण पडले व आरसीबीने १७ धावांनी विजय संपादन केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound