हनुमानाचा अवतार असल्याने माकडाला काहीच करू शकत नाही- जयंत पाटील

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राणा दाम्पत्याने नागपुरातील मंदिरात हनुमान चालीसा पठण केले आणि अमरावतीकडे रवाना झाले यावरून माकडाला काहीच करू शकत नाही, हनुमानाचा अवतार आहे, अशी खोचक टीका ना. जयंत पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता वाद होण्याचे संकेत मिळाले आहेत.

खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा दाम्पत्य नवी दिल्ली येथून आज नागपुरात दाखल होऊन तिथल्याच मंदिरात हनुमान चालीसा पठन केले आणि अमरावतीकडे कूच केले. राज्यात अनेक राजकीय पक्षांकडून आंदोलन करण्यासाठी हनुमान चालीसा पठणाचा मार्ग स्वीकारला जात आहे. हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून राज्यातले राजकारण पुन्हा तापणार असल्याचे दिसून येत आहे.

याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या टिप्पणीचा व्हिडीओ व्हायरल होत असून राज्यात हनुमान चालीसाच्या मुद्द्यावर, माकडांचा त्रासापासून वाचण्यासाठी नागरिकांनी कौलारु ऐवजी सिमेंट-काँक्रीटचे घर बांधण्याची तयारी ठेवा. त्यातून कौले आणि माकडांचा त्रास बंद होईलही, पण माकडांना काहीच करू शकत नाही. तो हनुमानाचा अवतार असल्याचे ना. जयंत पाटील यांनी मिश्कील टीकाही केली आहे.

Protected Content