एस.डी.भिरुड यांचा अ‍ॅथलेटीक्स असोसिएशनतर्फे सत्कार

d5c9daca a270 4d90 bd4b dfa1417cd3ef

अमळनेर (प्रतिनिधी) राज्य माध्यमिक शिक्षकसंघ व राज्य कलाशिक्षक संघांचे सचिव तथा जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपिढीचे अध्यक्ष एस डी भिरुड सर यांना इंडिपेंडन्ट टिचर्स युनियनचा विशेष शिक्षक गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा जळगाव जिल्हा अ‍ॅथलेटीक्स असोसिएशनतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला.

यावेळी संघटनेचे सचिव राजेश जाधव, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.पी.आर.चौधरी उपाध्यक्ष प्रा.इक्बाल मिर्झा,जेष्ठ सल्लागार मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी,सहसचिव किशोर पाटील, सदस्य ताज्युद्दीन शेख,प्रा.समीर घोडेस्वार,देवानंद पाटील,सचिन महाजन, संतोष पवार,मनोज वाघ होते. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून शालिग्राम भिरुड शिक्षकांच्या समस्या सोडण्यासाठी नेहमी कटिबद्ध असतात. त्यांनी आतापर्यंत शिक्षक संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलनांमध्ये भाग घेऊन शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्री.भिरूड हे जळगाव जिल्ह्यामध्ये नामांकित माध्यमिक शिक्षक व शिक्षेकेत्तर पतपेढीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे त्यांना हा पुरस्कार दिल्याचे आयोजकांनी सांगितले. श्री.भिरूड यांचे डि.टी.एफ.चे समन्वयक व जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक पी डी पाटिल ,ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन , साने गुरुजी शिक्षक पतपेढी चे संचालक तुषार पाटील मुख्याध्यापक संघाचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील ,टिडीएफ चे तालुकाध्यक्ष सुशील भदाणे यांनी अभिनंदन केले.

Add Comment

Protected Content