वंचित बहुजन आघाडीच्या घोषणेपूर्वीच एमआयएम नेत्याचा उमेदवारी अर्ज दाखल

ambedkar owesi

नागपूर (वृत्तसंस्था) वंचित बहुजन आघाडीने नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्याआधीच एमआयएमचे माजी अध्यक्ष आणि स्थानिक नेते शकील पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नागपूरच्या उमेदवारीवरुन वंचित बहुजन आघाडीत मतभेद होतात की काय?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागपूरच्या अत्यंत महत्वपूर्ण जागेच्या उमेदवारीबद्दल भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. परंतु कुठलीही अधिकृत घोषणा करण्याआधी एमआयएमचे स्थानिक नेते शकील पटेल यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विदर्भात पक्षाला किमान एक जागा मिळालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच आपल्या उमेदवारीला असदुद्दीन ओवैसी यांचा पाठिंबा असल्याचा दावाही शकील पटेल यांनी केला आहे. दरम्यान, नागपूरच्या उमेदवाराबद्दल प्रकाश आंबेडकर लवकरच त्यांचा निर्णय जाहीर करतील. तोवर असे दावे अधिकृत नसल्याचे मत भारिप बहुजन महासंघाच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले आहे.

Add Comment

Protected Content