जळगावात ‘ब्युटी सेमिनार’ उत्साहात

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । शहरात आज (दि.२० नोव्हेंबर) रोजी शिवतेज प्रतिष्ठान व जनमत प्रतिष्ठानकडून स्मार्ट लूक ब्युटी वर्ल्डमध्ये मुली, गृहिणीसाठी मोफत ब्युटी सेमिनार आयोजित करण्यात आला. 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे देवेंद्र भावसार, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री यांनी आत्मनिर्भर भारत व महिलांना स्वयंरोजगार विषयी मार्गदर्शन केले. तसेच महिला निर्मूलन अत्याचार समितीच्या जिल्हाध्यक्ष सूचित्राताई महाजन यांनी मुलींच्या सक्षम तेवर मार्गदर्शन केले. मुलींनी स्वतःच्या पायावर उभी राहून कसा व्यवसाय करावा याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक जी. दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले. तर जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज जी नाले यांनी कार्यक्रमाचे समारोप केला. यासेमिनार साठी स्मार्ट ब्युटी वर्ल्ड च्या संस्थापिका अनिता दसरे व अन्याय अत्याचार निर्मूलन समिती जिल्हा संघटक हर्षाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!