जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजीनगर येथे राहणाऱ्या विवाहितेला पैशांची मागणी करून दारूच्या नशेत मारहाण करून छळ केला, तसेच दोन्ही मुलींना देखील शिवीगाळ करत दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात मंगळवारी 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील शिवाजीनगर येथे रेखा श्रीकांत देवरे या महिला आपल्या पती श्रीकांत भास्कर देवरे आणि दोन मुलींचा वास्तव्याला आहेत. विवाहितेला माहेराहून पैसे आणावे तसेच दारूच्या नशेत येऊन शिवीगाळ करत मारहाण केले दरम्यान विवाहितेच्या मुलीने यासंदर्भात महिला दक्षता समिती जळगाव येथे तक्रार दिली आहे याचा राग येऊन श्रीकांत देवरे याने दोन्ही मुलींना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली दरम्यान या त्रासाला कंटाळून महिलेने मंगळवारी 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार श्रीकांत भास्कर देवरे (वय-४०) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत पाटील करीत आहे.