जुन्या भांडणाच्या वादातून तिघांना मारहाण; पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणासह मावशी व मावसभावाला बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील नशिराबाद रोडवर घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, किसन सुपडू अहिरे (वय-२५) रा. खेडी बु ता.भुसावळ जि.जळगाव हा तरूण १० मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तालुक्यातील नशिराबाद ते बेळीगाव दरम्यानच्या रस्त्याने मावशी शोभाबाई सोनवणे आणि मावसभाऊ सुरज सोनवणे यांच्यासोबत कामानिमित्त जात होते. त्यावेळी बंटी रविंद्र पवार (वय-२१) रा. भागपूर ता.जि.जळगाव याच्यासह अनोळखी तीन दुचाकीवर आलेले नऊ जण येवून म्हणाले की, भागपूर येथील महिलेला का मारले असे विचारून किसन अहिरेसह मावशी व मावस भावाला नऊ जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात सुरज सोनवणे हा गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे. किसन अहिरे यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गणेश सोनवणे करीत आहे.

Protected Content