भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील साकेगाव येथील एका तरूणाला मागील भांडणाच्या कारणावरून तिघांनी बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, अनिल पुंडलिक पाटील (वय-५८) रा. साकेगाव ता.भुसावळ जि.जळगाव हे शेती करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. ११ मे रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास साकेगाव शिवारातील शेत काम करत असतांना मागील भांडणाच्या कारणावरून पंकज अशोक कुरकुरे, लोकश अशोक कुरकुरे आणि अशोक रंगन्नाथ कुरकुरे यांनी शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली. यात अनिल पाटील हे जखमी झाले. लोकेश कुरकुरे आणि अशोक कुरकुरे यांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. शेतातील काही उपस्थित नागरीकांनी त्यांची सोडवासोडव केली असता त्यांनाही शिवीगाळ व मारहाण केली. अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय पाहेकर करीत आहे.