किरकोळ कारणावरून वृध्दाला मारहाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शिवारातील शेतातील रस्ता मातीने बुजल्याच्या रागातून एका वृध्दाला दोन जणांनी काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुभाष पोपट मराठे (वय-७८) रा. दादाजी नगर, धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हे धरणगाव शिवारातील शेतातून जात असतांना शेतातील रस्ता मातीने बुजल्याच्या रागातून संदीप शांताराम मराठे, शांताराम पोपट मराठे आणि रूखमाबाई मराठे तिघे रा. हनुमान नगर, जळगाव यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जीवंत न ठेवण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर सुभाष मराठे यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील करीत आहे.

Protected Content