नवी दिल्ली प्रतिनिधी । महाराष्ट्र आणि हरयाणा येथे होत असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीमुळे भारतीय क्रिकेट बोर्डाची निवडणूक एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. याआधी 22 ऑक्टोबरला होणारी निवडणूक आता २३ ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती बीसीसीआयचे प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी मंगळवारी दिली
याबाबत अधिक माहिती अशी की, या दोन्ही राज्यांत २१ ऑक्टोबरला निवडणुका होत आहेत. त्यामुळे या दोन विभागातील संलग्न राज्य संघटनांना बीसीसीआयच्या निवडणुकीत मतदान करताना अडचण होऊ नये यासाठी २२ ऑक्टोबरऐवजी २३ ऑक्टोबरला निवडणुका घेण्याचे ठरले आहे. समिती प्रमुख विनोद राय यांनी सांगितले की, ‘बीसीसीआयच्या निवडणुका वेळेवरच होणार आहेत. केवळ राज्यांतील निवडणुकांचा विचार करता मूळ तारखेत बदल करून ती एकदिवस पुढे ढकलण्यात आली आहे.’