बस चालकास मारहाण करणाऱ्या आरोपीस सश्रम कारावास

0court 383

जळगाव प्रतिनिधी । चोपड्याहून जळगावला येणाऱ्या प्रवाशीने वाहकास शिवीगाळ करून बसच्या काचा फोडल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपीस सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

याबाबत हकिकत अशी की, 9 जुलै 2016 रोजी बस क्रमांक एमएच 20 बीएल 1433ने चोपडयाहून जळगावला ईदगाव मार्गे येत असताना शिवाजी नगर भागातील गेंदालाल मिल परिसरात बस आल्यावर संशयित आरोपी नरेंद्र संतोष नाडे रा. गेंदालाल मिल परीसर यांने “ए मादरचोद गेंदालाल मिल दर्ग्याजवळ बस थांबव” असे शिवीगाळ करून फिर्यादी बसचालक याची कॉलर पकडून शिवीगाळ करुन मारहाण करुन तुला पाहून घेईल अशी धमकी देवून बसच्या काचा फोडून रुपये १००००/-चे नुकसान केल्याबद्दल आरोपीविरुध्द खटला चालविण्यात आला.

त्यात बसचालक, वाहक तसेच अन्य प्रत्यक्षदर्शी व इतर महत्वाचे असे एकूण ०७ साक्षीदार तपासण्यात आले त्यात सरकार पक्षाचा प्रभावी युक्तिवाद लक्षात घेता व पुरावा लक्षात घेता न्यायालयाने आरोपीस भादंवि कलम ३५३, ३३२ व ५०४ प्रमाणे अनुक्रमे तीन वर्ष, दीड वर्ष व एक वर्ष व सहदंड अनकमे रुपये ३०००/-, रु.२०००/- व रु.१०००/- दंड, दंड न भरल्यास अनुक्रमे ०६ महिने, ०४ महिने व ०२ महिने अशी कारावासाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. ठुबे यांनी ठोठावली.

याकामी सरकार पक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता पंढरीनाथ चौधरी यांनी साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयासमोर आलेले पुरावे व प्रभावी युक्तिवाद यामुळे न्यायालयाने आरोपीस दोषी धरले आहे. याकामी पैरवी अधिकारी पोलिस नाईक तुषार मिस्तरी यांनी मोलाची मदत केली.

Protected Content