शिरागड येथील सप्तश्रृंगी देवी मंदीरातील तीन दानपेट्यांची चोरी

यावल प्रतिनिधी । तापी काठी असलेल्या शिरागड येथील देवी सप्तश्रृंगी मंदीरातील तीन दानपेटी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील शिरागड येथील देवी सप्तश्रृंगी येथील मंदीराच्या तीन दानपेट्या बाहेरच असतात. मंदीराच्या बाहेर असलेल्या तीन दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी २६ ऑक्टोबर रोजीच्या पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंदीरातील विश्वस्त यांनी यावल पोलीसात धाव घेतली.  शांताराम सदू सोळंके (वय-७१) रा. शिरागड ता. यावल यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय देवरे करीत आहे.

Protected Content