बारसे व राखुंडे हत्याकांडातील आरोपींवर मकोका अंतर्गत होणार कारवाई

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यास हादरा देणार्‍या संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपींवर आता मकोका कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार असून याबाबतचा अहवाल पोलीस प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर सादर केला आहे.

भुसावळ शहरातील मरिमाता मंदिर परिसरात माजी नगरसेवक संतोष मोहन बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांची अतिशय निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी माजी नगरसेवक राजू भागवत सुर्यवंशी, बंटी पथरोड, विष्णू पथरोड, शिव पथरोड, विनोद चावरिया, सोनू पंडित, करण पथरोेड, नितीन पथरोड आणि अन्य तीन जण अशा एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता सदर संशयित आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोकाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा असा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने तयार केला असून तो नाशिक येथील पोलीस महानिरिक्षकांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, यासोबत शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातल्या काही अन्य समाजकंटकांवर देखील याच प्रकारची कारवाई करण्याच्या हालचाली पोलीस प्रशासनाने सुरू केल्या आहेत. यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Protected Content