जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बारी समाजाचा राज्यस्तरीय उपवधू-वर परिचय मेळाव्याचे रविवार दि. ३० ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
नागवेल प्रतिष्ठान जळगाव आयोजित बारी समाजाचा राज्यस्तरीय उपवधू-वर परिचय मेळाव्याचे रविवार दि. ३० ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे सकाळी ठीक १० वा ३० मि. करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी गुजरात, मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून २५० पेक्षा जास्त उपवधू-वरांची नोंदणी झालेली उपवर-वधू सूचीचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. तरी बारी समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन नागवेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितिन बारी यांनी केले आहे. यशस्वितेसाठी भूषण बारी, शरद वराडे, अतुल बारी, योगेश बारी, योगेश येऊल, बंटी लावणे, प्रा. दिपक बारी, लतिष बारी, नरेंद्र बारी, प्रकाश रोकडे हे कामकाज पाहत आहेत.