पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या काही महिन्यांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार येणा-या विधानसभा निवडणुकीत बारामतीतून लढणार नाहीत अशा चर्चा राजकीय वर्तुळात सतत होत असतात. अशात आता बारामतील एका कार्यक्रमात, बारामतीकरांना माझ्याशिवाय दुसरा कोणीतरी आमदार मिळायला पाहिजे, त्यानंतर तुम्ही माझ्या १९९१ ते २०२४ या काळातील कारकिर्दीची तुलना करा. आम्ही सकाळपासून कामाला लागतो. आता आम्ही सकाळी उठतो काहीजण यावरुन आमची चेष्टा करतात असे विधान केले. यानंतर ते विधानसभा लढणार नसल्याच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.
दरम्यान यावेळी अजित पवार यांनी हे विधान केल्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी गोंधळ करत हे मान्य नसल्याचे म्हटले. दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडला आहे. उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भातील काही भागांनंतर आता ही यात्रा पुन्हा सुरू होणार आहे.