मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात आता गणेशोत्सोवासह अनेक सणसमारंभ जवळ आले आहेत. ऑगस्ट महिना आता संपत आला आहे. त्यामुळे आपल्या बँकेच्या कामांचे योग्य नियोजन करा कारण सप्टेंबर महिन्यात १५ दिवस बँकांना सुटी राहणार आहे. त्यामुळे बँकेच्या सुटीच्या दिवशी नेमके तुमचे कामाचे नियोजन यायला नको. सप्टेंबर महिन्यात यंदा विविध राज्यांमध्ये तब्बल १५ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये दुसरा आणि चौथ्या शनिवारसह रविवारचाही समावेश आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी बँकेला सुट्या कधी राहणार याची महिन्याची यादी जाहीर करत असते. यानुसार गणेश चतुर्थी ते इदमिलादपर्यंत विविध राज्यांमध्ये बँकांना सुटी राहणार आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या दिवसाची सुरुवातच रविवारी होत असल्याने देशभरातील सर्व बँका १ सप्टेंबरला सुट्टी राहणार आहे. सप्टेंबर महिन्यात यंदा एकूण १५ सुट्ट्या आल्या असून शनिवार, रविवार अशा चार दिवस देशभरातील बँका बंद राहणार आहेत. बाकी राज्यनिहाय, सणासमारंभांनुसार राज्यनिहाय या सुट्या अवलंबून राहणार आहेत.
सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, ईद ए मिलाद यासह ओणम सणही राहणार आहे. या महत्वाच्या सणांदिवशी कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये सुटी राहणार हेही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले आहे. या सुट्यांनुसार बँकेच्या कामांचे योग्य नियोजन केल्यास बँकाची कामं रखडून राहणार नाहीत.