बँकांचा आजपासून दोन दिवस कामबंद आंदोलन; कर्मचाऱ्यांचे निदर्शने (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने राष्ट्रीयकृत बँकांचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्‍न सुरू आहे. बँकांचे खाजगीकरण थांबविण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांसह दहा बँक  संघटनांनी दोन दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे.  जळगाव जिल्ह्यातील बँक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँक अधिकारी व कर्मचारी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन व ऑल इंडिया बँकिंग ऑफिसर्स कॉन्फेडरेशनच्या झेंड्याखाली एकत्र येऊन बँक खासगीकरणाच्या विरोधात पुकारलेल्या संपात सहभागी झाले. केंद्र सरकारच्या प्रस्तावित बँकिंग अमेंडमेंट बिल २०२१ मध्ये होऊ घातलेल्या खाजगीकरणाच्या धोरणांच्या विरोधात जोरदार घोषणा देत निदर्शने केली. दोन दिवस बँका बंद राहणार असुन या कामबंदमुळे पहिल्याच दिवशी जळगाव जिल्‍ह्यातील सुमारे ९६० कोटी रूपयांचे व्‍यवहार ठप्‍प झाले आहेत अशी माहिती मिळाली आहे. मागण्या मान्य न झाल्यास बॅँका बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

 

याप्रसंगी युनायटेड फोरमचे जिल्हा समन्वयक अभिलाष बोरकर, दत्तात्रय चौधरी, प्रताप पाटील, रफिक पिंजारी, धनंजय गावंडे, मोहन खेवलकर, निलेश काळे, विकास कल्याणी, जी.पी. जावरे, अमोल तांगडे यांच्यासह आदी जिल्ह्यातील सरकारी बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content