रक्तदान जनजागृतीसाठी बांगड बहीण भाऊ महाराष्ट्र दौऱ्यावर (व्हिडीओ )

WhatsApp Image 2019 05 05 at 8.10.40 PM

जळगाव (प्रतिनिधी ) पुणे येथील महेश बांगड व स्नेहल बांगड हे दोघे भाऊ बहीण ‘रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट’चे प्रतिनिधी असून रक्तदानाबाबत जागृती करण्यासाठी ते महाराष्ट्र दौऱ्या आहेत. या अंतर्गत ते महाराष्ट्रातील २० शहरांना भेट देणार असून त्यानुसार आज त्यांनी जळगावला भेट देऊन रेड क्रॉस सोसायटीच्या सभागृहात मार्गदर्शन केले.

 

बांगड भाऊ बहिणीचा लाईव्ह ट्रेडशी संवाद

बांगड बांधवानी लाईव्ह ट्रेंड शी बातचीत करतांना त्याच्या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली. उन्हाळ्यात रक्ताचा तुडवडा जाणवत असतो यावेळी रक्तदात्यांनी स्वच्छेने रक्तदान करण्यास प्रेरित करण्याचा उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेऊन हा दौरा आखला आहे. या जनजागृतीची सुरवात पुणे येथून करण्यात आली आहे. यानंतर सोलापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, नागपूर, अमरावती, अकोला येथे मार्गदर्शन केले असून आज जळगावात दाखल झाले आहेत. आज रात्री औरंगाबाद येथे तर उद्या जालना येथे मार्गदर्शन करणारं आहेत. तसेच पुढे अहमदनगर, शिर्डी, नाशिक, नवी मुबई, लोणावळा, सातारा, कराड, इचलकरंजी, कोल्हापूर येथे परत पुणे येथे जाणार आहेत. त्यांचा दुसरा एक उद्देश हा महाराष्ट्रात रक्तदान चळवळ संघटितपणे चालविणे हा देखील आहे. अन्नदानापेक्षा रक्तदान करा असे आवाहन त्यांनी केले आहे.बांगड बांधवानी लाईव्ह ट्रेंड शी बातचीत करतांना त्याच्या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली. उन्हाळ्यात रक्ताचा तुडवडा जाणवत असतो यावेळी रक्तदात्यांनी स्वच्छेने रक्तदान करण्यास प्रेरित करण्याचा उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेऊन हा दौरा आखला आहे. या जनजागृतीची सुरवात पुणे येथून करण्यात आली आहे. यानंतर सोलापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, नागपूर, अमरावती, अकोला येथे मार्गदर्शन केले असून आज जळगावात दाखल झाले आहेत. आज रात्री औरंगाबाद येथे तर उद्या जालना येथे मार्गदर्शन करणारं आहेत. तसेच पुढे अहमदनगर, शिर्डी, नाशिक, नवी मुबई, लोणावळा, सातारा, कराड, इचलकरंजी, कोल्हापूर येथे परत पुणे येथे जाणार आहेत. त्यांचा दुसरा एक उद्देश हा महाराष्ट्रात रक्तदान चळवळ संघटितपणे चालविणे हा देखील आहे. अन्नदानापेक्षा रक्तदान करा असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

Add Comment

Protected Content