रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांना जिल्हयात सर्वोत्कृष्ट तहसीलदार सन्मान

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तहसीलदार बंडू कापसे यांना 2023-24 या आर्थिक वर्षातील सर्वोत्कृष्ट तहसीलदार म्हणून सन्मानित करण्यात आली आहे जिल्हा निवड समितीच्या अध्यक्षतेखालील उपक्रमात, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, आणि निवड समिती सदस्य सचिव विजय सूर्यवंशी यांच्या समवेत तहसीलदार कापसे यांची निवड करण्यात आली आहे.

रावेर तालुक्याची धुरा 1 एप्रिल 2023 रोजी सांभाळल्यानंतर, तहसीलदार कापसे यांनी अनेक आव्हानांचा सामना करत जनतेच्या हितासाठी निष्ठेने काम केले. त्यांच्या कार्यकाळात ई-चावडी, ऑनलाईन वसुली, ई-डाटा बल्क सायनिंग, ई-पीक पाहणी यांसारख्या उपक्रमांमध्ये शंभर टक्के प्रगती साधली. त्यांनी संजय गांधी योजना, विधवा, दिव्यांग, परित्यक्त्या आणि अती गरीब नागरिकांना लाभ देण्यास प्राधान्य दिले.

शेतकऱ्यांसाठी शेत-शिवार रस्ते मोकळे करणे आणि महसुली प्रकरणांचा मुदतीत निपटारा करणे यासारख्या उपक्रमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल तहसीलदार बंडू कापसे यांना स्वातंत्र्यदिनी सन्मानित करण्यात येणार आहे, जो त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा एक मानाचा ठसा ठरेल.

Protected Content