नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कॉंग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांच्या टिशर्टच्या मूल्यावरून टीका करणार्यांना कन्हैयाकुमारने जोरदार उत्तर दिले आहे.
राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद लाभत असतांनाच भाजपने त्यांनी महागडे टिशर्ट घातल्याचा आरोप केला आहे. याला विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, १२ कोटींची कार, १० लाखांचा सूट आणि १.५ लाखांचा चष्मा असलेल्या बनावट फकीराला टी-शर्टचा त्रास! साहेब, तुम्हाला पाहिजे तेवढा गोंधळ करा, मुद्दा तुमच्या आणि आमच्या कपड्यांचा नाही. तो १४० कोटी लोकांच्या ‘रोटी, कपडा आणि मकान’चा आहे. आम्ही त्या मार्गाला चिकटून राहू. अशा शब्दांमध्ये कॉंग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी ट्वीट करून निशाणा साधला आहे.
तर कॉंग्रेस नेत्यांनी देखील राहूल गांधी यांच्यावरील टिकेला उत्तर दिले आहे. यामुळे याच मुद्यावरून दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे.