सावदा येथे केळी उत्पादन व मार्केटींगवर चर्चासत्र उत्साहात

banana workshop savda

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । महिंद्रा ग्रीनयार्डतर्फे येथे केळी उत्पादन व मार्केट लिंकेजवर चर्चासत्र उत्साहात पार पडले.

सावदा येथे महिंद्रा ग्रीनयार्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक शैलेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये विशाल अग्रवाल रावेर , प्रशांत महाजन तांदळवाडी, हरनिशभाई राठोड इटवाड गुजरात, नितीन नंदवने भुसावळ, सदाभाऊ महाजन तांदळवाडी, विशाल पाटील केर्‍हाळा, किरण निकम, हारूनभाई सावदा आणि मही केला ग्रुप वडोदरा गुजरात यांनी विशेष सहभाग नोंदवला.

या चर्चासत्रामध्ये निर्यातक्षम केळी उत्पादन करतांना अतिमहत्वांची फ्रूट केअर पद्धती, एकात्मिक विकास धोरण आणि एमजीपीएलच्या डायरेक्ट प्रोक्युअरमेंट पॉलिसीची संकल्पना शैलेंद्र जाधव यांनी प्रस्तुत केली. या कार्यक्रमात कंपनीच्या सबोरो दर्जाच्या प्रिमीयम केळी उत्पादक शेतकर्‍यांचा सत्कार प्रमाणपत्र आणि भेट वस्तु देउन करण्यात आला. याप्रसंगी विजय पाटिल-विवरा, मनिष पाटील-मस्कवाद, हरनीशभाई राठोड-गुजरात यांनी एमजीपीएलबाबतचे अनुभव व मनोगत व्यक्त केले. शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी उपयुक्त बाबी आणी केळी पिकाचे प्रभावी खर्च नियोजन या विषयावर विशाल अग्रवाल यांनी मत मांडले. या चर्चा सत्राला शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.

हा कार्यक्रम घेण्यामागचे महिंद्रा ग्रीनयार्ड प्रायव्हेट लिमिटेडचे असे उद्दिष्ट होते की महिंद्रा समूहाच्या फार्मटेक प्रोस्पेरीटी अकनुशंगाने सबोरो प्रिमीयम दर्जाची केळी उत्पादन वाढवून ती केळी एमजीपीएलच्या डिस्ट्रीब्युशन सेंटर मार्फत दिल्ली-मुंबई यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये थेट वितरण करू शकतो. आणि याच बरोबर महिंद्रा समूह शेतकरी बांधवांना डायरेक्ट मार्केट लिंकेज उपलब्ध केले आहे. त्यांचा मोबदला हा थेट शेतकरी बंधूंच्या बँक खात्यावर कंपनीतर्फे जमा करण्यात येईल या व्यवहारांमध्ये कोणतेही मध्यस्थी न येता हा व्यवहार पारदर्शी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. हे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी एमजीपीएल ही अ‍ॅग्रोनोमी आणी फ्रुट केअरला विशेष प्रोत्साहन देणार असल्याची माहिती या कार्यक्रमात शैलेंद्र जाधव यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश जाधव व किरण निकम यांनी विशेष प्रयास केले. सुत्रसंचालन साहिल तांभेकर यांनी केले. याप्रसंगी परिसरातील केळी उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content