यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील यावल सर्कल मधील पिक विम्या कंपनीकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या नुकसानीचे दिले जाणाऱ्या पिक विम्याचा लाभ मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पिक विमा कंपनीच्या दिरंगाई बद्दल मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसानीचे शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या माध्यमातुन संरक्षण दिले जाते, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हे या योजनेचे वैशिष्ठ आहे.
यावल शहरासह महसुल मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या मोहराळा, हरिपुरा, वड्री, परसाडे, विरावली ,कोरपावली, महेलखेडी, बोरावल, भालशिव, पिंप्री, टाकरखेडा या गावातील केळी उत्पादक शेतकरी यांना व्यापक आपत्तीच्या बाबतीत, राज्य सरकारची यंत्रणा पिक उत्पन्नाची आकडेवारी प्रदान करते. या डेटाच्या आधारे विमा कंपनीच्या माध्यमातुन नुकसानीचे काम करते आणि त्याची उंबठयावरील उत्पन्नाशी तुलना करते. या सर्व प्रक्रीये नंतर देखील शेतकऱ्यांना पिक विमाच्या लाभासाठी दुर्लक्षीत कारभारामुळे अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना लाभ मिळालेले नाही. पिक विमा कंपनीच्या अशा दिरंगाई व वेळकाढू कारभारामुळे शेतकरी बांधवांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .पिक विमा कंपनी कडून केळी उत्पादक शेतकरी यांना अद्याप पर्यत मिळालेले नाही या प्रश्नाचे उतर शेतकऱ्यांना कोण देणार असा देखील प्रश्न पडला असुन या संदर्भात कृषी विभागाच्या सुत्रांकड्डन मिळालेल्या माहिती वरून शासकीय पातळीवर सेटेलाईट यंत्रणेव्दारे ज्या केळी पिकांची पाहणी करण्यात आली असुन ज्यांच्या शेतात केळी पिकांची लागवड केलेली असेल त्याच शेतकऱ्यांना विम्याचा लाभ येत्या काही दिवसा मिळणार असल्याचे सांगण्यात आले.