यावल येथे बालाजी महाराजांचा रथोत्सव उत्साहात

d6aa2874 5604 450e b8b0 d82e0796a20f

यावल (प्रतिनिधी) येथील सुमारे सव्वाशे वर्षांची परंपरा असलेला श्री बालाजी महाराज
रथोत्सव आज (दि.१९) सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शहरात चोपडा नाक्यावरील नदीपात्रात दरवर्षी मोठी यात्रा भरते. यावेळी श्री खंडेराव महाराजांच्या जयघोषाने मोठ्या उत्साहात १२ गाड्या ओढण्यात आल्या.

 

बालाजी महाराजांच्या जयघोषात नागरिकांनी रथ ओढण्यास सुरवात केली. सायंकाळी ७.०० वाजेच्या सुमारास महाराणा प्रताप मंडळ नगराजवळील नदीपात्रात रथयात्रेचे आगमन झाले. व्यास मंदिर ते महाराणा प्रताप नगरापर्यंत सुमारे एक कि.मी. पर्यंत नदीपात्रातून नागरीकांनी रथ ओढत आणला. तसेच येथे खंडोबा महाराजांच्या १२ गाडया ओढण्यात आल्या. रथोत्सव,

यात्रा आणि १२ गाडया ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यांनतर रथयात्रेचे शहरात आगमन झाले. ही रथयात्रा रात्रभर शहरात फिरून पहाटेच्या सुमारास भवानी माता मंदिराजवळ रथ यात्रेची
सांगता झाली.

तहसीलदार जितेन्द्र कुंवर, पो.नि. दत्तात्रय परदेशी व सहकारी बंदोबस्त ठेवला तर शांतता समिती सदस्य, विविध राजकीय
पक्षाचे पदाधिकारी उत्सव शांततेत पार पाडण्याकामी सहकार्य केले. याशिवाय हनुमान जयंती निमित्ताने शहरातील मारुती मंदिरात जन्मोत्सव
उत्साहात साजरा करण्यात आला. येथील मोठा मारोती मंदिरावर पहाटेच जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भंडाऱ्याचा कार्यक्रमही पार पडला.

Add Comment

Protected Content