आयएमएच्या मानहानी दाव्याची रामदेव यांनी उडविली खिल्ली !

हरिद्वार । इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमए संघटनेने केलेल्या एक हजार कोटी रूपयांच्या दाव्याची बाबा रामदेव यांनी खिल्ली उडवत पुन्हा एकदा या संघटनेवर हल्लाबोल केला आहे.

बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीवर गंभीर प्रश्‍न उपस्थित केलेल्या आयएमए संघटनेने त्यांच्या विरूध्द एक हजार कोटी रूपयांचा दावा दाखल केला आहे. या मानहानीच्या दाव्याचीबाबा रामदेव यांनी खिल्ली उडवली आहे. ज्यांना काही मान नाही, असे लोक एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करत आहेत, अशा शब्दात एका लाइव्ह प्रोग्रॅममध्ये बोलतांना स्वामी रामदेव यांनी टिकास्त्र सोडले.

योग गुरु बाबा रामदेव म्हणाले, सध्या देशात धार्मिक, वैचारिक आणि सांस्कृतिक दहशतवाद वेगाने पसरत आहे. यातच आणखी एका नव्या प्रकारच्या ट्रिटमेंट दहशतवादाचीही भर पडली आहे. आपली लढाई त्याविरोधात आहे. अ‍ॅलोपॅथिकचा हा उद्योग जवळपास दो लाख कोटींचा आहे. याविरोधात आपण लढत आहोत. सरकार आपल्या बाजूने असो वा नसो, भलेही सरकार विरोध करो, पण आपला लढा सुरूच राहील आणि त्यात आपण यशस्वी होऊ.

रामदेव पुढे म्हणाले की, देश आणि जगातील विविध रुग्णालयांत कोरोनावरील उपचारासाठी जी-जी औषधी वापरली जात आहे, त्यांपैकी कुठल्याही एका औषधाचे अद्यापही कोरोनावरील उपचार प्रोटोकॉलअंतर्गत क्लिनिकल ट्रायल झालेले नाही. मग, कोणत्या आधारावर या औषधांचा वापर रुग्णांसाठी केला जात आहे, असा प्रश्‍नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.