अयोध्या प्रकरणी २ ऑगस्टला पुढील सुनावणी

1484912949 6Ar3oc Supreme Court ABP

नवी दिल्ली वृत्तसंस्था । अयोध्या जमीन वादाच्या प्रकरणी ३१ जुलैपर्यंत अंतिम रिपोर्ट देण्याचे आदेश देतांना सुप्रीम कोर्टाने आता यावर २ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले आहे.

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आज मध्यस्थ समितीचा प्रगती अहवाल स्विकारला. तथापि, त्यांना ३१ जुलैपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत मध्यस्थ समितीला अयोध्याप्रकरणावर चर्चेतून तोडगा काढण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. २ ऑगस्ट रोजी या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार असून त्यात मध्यस्थ समितीमार्फत याप्रकरणावर तोडगा काढायचा की कोर्टात दररोज सुनावणी करायची याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Protected Content