रावेर तालुक्यात कोरोनाबाबत पथनाट्यातून जनजागृती

रावेर प्रतिनिधी । तालुक्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून पथनाट्यच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आली. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी देखिल यात सहभाग घेत जवळच्या सर्वांनी  सुरक्षित अंतर ठेवण्याचा संदेश जनतेला दिला आहे.

जळगाव जिल्हाधिकारी  यांचे कडील सुचने नुसार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगांव यांनी महाराष्ट्र राज्यात कोविड -19 विषाणुच्या संसर्ग वाढत असल्याने रावेर तालुक्यात आज दि .17 रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित बेटी बचाव बेटी पढाव अभियान अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमात सोबत कोरोना व्हायरस विषयी जनजागृती करण्यात आली यावेळी विनोद ढगे यांनी पथनाटय सादर करुन जनते मध्ये जन जागृती केली. कार्याक्रमाच्या ठिकाणी तहसीलदार उषाराणी देवगुणे मुख्याधिकारी रविंद्र लांडे महसुल सहायक प्रविण पाटील उपस्थित होते.

 

Protected Content