अमळनेर (प्रतिनिधी) तालुका क्रीडा परिषदेच्यावतीने सन २०१८-१९ वर्षात आयोजित विविध स्पर्धेत प्राविण्य प्राप्त सांघिक व वैयक्तिक बक्षिस समांरभ नुकताच जी.एस.हायस्कुलमध्ये संपन्न झाला. यावेळी शिक्षकांना देखील सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक के. डी सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर पं.स.चे शिक्षण विस्तार अधिकारी .पी.डी. धनगर,खा.शि.चे संचालक कल्याण पाटील,प्राचार्य रविद्र माळी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या तालुका अध्यक्ष अमोल माळी,खा.शि,मं,विश्वस्त वसुंधरा लाडगे,उपमुख्याध्यापक,आर सी मोरानकर,पर्यवेक्षक ए.आर.बडगुजर,माध्यमिक संघाचे प्रमुख संजय पाटील ,आंतरराष्ट्रीय खेळाडू व भारताचा कर्णधार विशाल फिरके(आटया पाटया),राष्ट्रीय खेळाडू अंकित वाघ,आयकेडीचे संचालक किरण माळी,समिती सचिव डी.डी.राजपुत,महेश माळी,एन.डी. विसपुते व तालुका क्रीडा प्रमुख एस. पी वाघ,कैलास पाटील व तालुक्यातील सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमात तालुक्यातील खो खो ,कबड्डी,व्हाॕलिबाॕल,क्रीकेट,फुटबाॕल व वैयक्तिक मैदानी,कुस्ती,बुध्दीबळ,कराटे,तायक्वाॕदों,या प्रकारात विजयी व उपविजयी,खेळाडूना टाॕफी,पदके देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात राष्ट्रवादी शिक्षक संघटनेच्या वतीने पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक महेश नेरपगारे यांचाही सत्कार साने गुरुजी शिक्षण संस्थेचे सचिव संदीप घोरपडे, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, किल्ला संघाचे तालुकाध्यक्ष एस.पी वाघ, क्रीडा शिक्षक डी.डी. राजपूत, महेश माळी एन.डी.विसपुते यांनी केला. प्रस्तावना,सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन एस. पी वाघ यांनी केले.