अ‍ॅशेज मालिकेवर ऑस्ट्रेलियाचाच कब्जा

austrelia team

मॅचेस्टर वृत्तसंस्था । ऑस्ट्रेलियाच्या संघाने यजमान इंग्लंडला चौथ्या कसोटी सामन्यात १८५ धावांनी धुळ चारून प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेज मालिकेवर कब्जा मिळवला आहे.

चौथ्या कसोटीत कांगारूंनी इंग्लंडला पराजीत करून २-१ अशी निर्णायक आघाडी घेतली आहे. शेवटची कसोटी इंग्लंडने जिंकली तरी आधीची अ‍ॅशेज मालिका ही ऑस्ट्रेलियाने जिंकलेली असल्यामुळे नियमानुसार आता बरोबरीत सुटूनही पाहुण्यांनाच मालिका विजयाचा सन्मान मिळणार आहे. पाहुण्या संघाचे गोलंदाज पॅक कमीन्स हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्टिव्ह स्मिथच्या २११ धावांच्या मदतीने त्यांनी पहिल्या डावात ८ गड्यांच्या बदल्यात ४९७ धावा करून डाव घोषित केला. इंग्लंडचा पहिला डाव मात्र ३०१ धावात संपल्याने पाहुण्या संघाला १९६ धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या डावात ६ गड्यांच्या बदल्यात १८६ धावा करीत डाव घोषित केला. इंग्लंडसमोर ३८३ धावांचे आव्हान ठेवले होते. परंतु, इंग्लंडंचा संघ ९१.३ षटकात केवळ १९७ धावा करू शकला. विशेष बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाने २००१ नंतर इंग्लंडमध्ये अ‍ॅशेज मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियात २०१७ साली झालेल्या मालिकेतही कांगारूंनीच विजय मिळवला होता.

Protected Content