कोरोना पॉझिटिव्ह संख्येवर लक्ष: आवश्यकता वाटल्यास मास्कसक्ती – उपमुख्यमंत्री

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यात कोरोना रुग्णाच्या वाढत्या पॉझिटिव्ह रुग्णसंख्येवर लक्ष असून आवश्यकता असेल त्यावेळी राज्यात मास्क सक्तीची अंमलबजावणी केली जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.

महाराष्ट्रामधील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती केली जाईल अशी जोरदार चर्चा असतानाच उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असून राज्यात सरकारचे धोरण काय यासंदर्भात जर तरच्या भाषेत उत्तर दिले.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत डॉ. व्यास देश, विश्वात आणि राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये काय चालले आहे यांचीसर्व अद्ययावत माहिती देतात. या सर्व माहितीमधून सध्या असे दिसून आले आहे कि, करोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढत आहे. मात्र व्हेटिंलेटर, ऑक्सिजन बेडवर फार कमी रुग्ण दाखल आहेत. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन बुस्टर डोस हा घेतला पाहिजे. अनेकांनी दुसरा डोस घेतलेलाच नाही त्यांनी तो घेतला पाहिजे. दोन्ही डोस घेणाऱ्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने तिसरा प्रीकोशन डोस घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे, आमची संसर्ग बाधित रुग्णसंख्येवर लक्ष आहे. जेव्हा मास्क वापरणे बंधनकारक केले पाहिजे अशी आवश्यकता वाटल्यास त्यावेळी आम्ही लगेच मास्क वापरणे बंधनकारक केले जाईल असेही, अजित पवार म्हणाले.

Protected Content