धरणगाव प्रतिनिधी । येथील महावीर पतसंस्थेच्या पिग्मी एजंटला भर दिवसा लुटण्याचा प्रयत्न फसला असून या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, येथील आज दुपारी महावीर पतसंस्थेच्या पिग्मी एजंट रस्त्याने पायी धनगर गल्लीतून अर्बन बँकेत जात होता. रिलायन्स टॉवर जवळ समोरून मोटरसायकलवर दोन चोरटे येत असताना त्या पिग्मी एजंट ला मारहाण करत दोन लाख अकरा हजार रुपये ही बॅग करण्याचा प्रयत्न केला. तथापि त्या चोरट्यांचा प्रयत्न त्याठिकाणी फसला. यामुळे चोरट्यांनी पिग्मी एजंटला मारहाण केली. यामुळे भेदरलेला तो एजंट पळत अर्बन बँकेत गेला असता त्यावेळी त्याला येथील कर्मचार्यांनी दवाखान्यात नेले अशी माहिती पिग्मी एजंट सागर बडगुजर याने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना केली.
दरम्यान, अगदी भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शेवटचे वृत्त आले तेव्हा या प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.