Home क्राईम महामार्गावर भीषण अपघात ; बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी

महामार्गावर भीषण अपघात ; बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी

0
109


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-नशिराबाद महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अपराजिता राधेश्याम सिसोदिया (वय ३०, रा. योगेश्वर नगर, जळगाव) या २६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने (क्र. MH 19 DB 4119) नशिराबादकडून जळगावकडे येत होत्या. नशिराबाद येथील सर्व्हिस रोडवरील DCB बँकेच्या पाठीमागील बाजूस त्या आल्या असता, समोरून येणाऱ्या बोलेरो गाडीने (क्र. MH 04 EL 8302) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेमुळे अपराजिता सिसोदिया या जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले असून उजव्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर बोलेरो चालक मदतीसाठी न थांबता वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला होता. याप्रकरणी फिर्यादी अपराजिता सिसोदिया यांच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र ठाकरे करत आहेत.


Protected Content

Play sound