सार्वे आश्रम शाळेमधील जनरेटरची चोरी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

पाचोरा प्रतिनिधी । सार्वे बु” ता. पाचोरा येथील शासकीय आश्रम शाळेतून जनरेटर चोरी झाल्याची घटना घडली असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले असून याबाबत चौकशी ची मागणी होत आहे.

याबाबत माहीती अशी की, यावल आदिवासी प्रकल्प अंतर्गत सार्वे ता. पाचोरा येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या वर्ग खोलीत विद्युत पुरवठा करण्यासाठी असलले जनरेटर एका खोलीत ठेवले होते. अज्ञात चोरट्यांनी येथील वर्ग खोलीत ठेवलेले सुमारे एक लाख रुपये दहा हजार किंमतीचे होंडा कंपनीचे १ हजार ५०० एच. पी. (हॉर्स पॉवर) जनरेटर चोरी झाल्याची घटना दि. 3 नोव्हेंबर  रोजी घडली होती. याबाबत नगरदेवळा पोलीस स्टेशन मध्ये आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव एरंडे यांच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो. हे. कॉ. ज्ञानेश्वर पाटील करीत आहे. 

नागरिकांनी केला जनरेटर चोरी चा उलगडा:-

आश्रम शाळेतील जनरेटर चोरी झाल्याची घटना दि. ३ रोजी झाली असता मुख्याध्यापक यांनी दुसऱ्या दिवशी पाचोरा पोलीस स्टेशन ला पञ देऊन आमच्या शाळेतील जनरेटर चोरी झाल्याची तक्रार दिली होती. याबाबत पोलीसांनी शाळेतील इतर काही  कर्मचारी यांची विचारपूस केली त्यानंतर आश्रम शाळेतील वसतीगृह अधिक्षक यांनी दि. ९ आॅक्टोबर २०२० रोजी पोलीसांना आमचे चोरी झाल्याचे जनरेटर सापडले असल्याचे पञ दिले. त्यामुळे पोलीसांनी पुढील अधिक काही तपास केला नाही परंतु याबाबत गावातील स्थानिक काही नागरिकांना जनरेटर चोरी प्रकरणी माहीती मिळाली असता त्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापक यांना विचारणा केली असता चोरी झाल्याचे सांगीतलं.

पंरतु ते पुन्हा शाळेत कोणी तरी आणून ठेवून गेल्याचे सांगीतलं. तेव्हा नागरिकांना शंका आली. आणि त्यांनी शाळेतील चोरी गेलेले जनरेटर च्या जागीच दुसरे कमी किमतीचे जनरेटर आढळून आले त्यामुळे नागरिकांनी चोरी प्रकरण दडपले जात तर नाही असा जाब विचारत मुख्याध्यापक यांना धारेवर धरले. यावेळी जनरेटर चोरी  प्रकरणी कोणाला तरी वाचवण्यासाठी प्रयत्न होत आहे संशय नागरिकांना आला असता त्यांच्या गुन्हा दाखल ची  मागणी नंतर आज या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनरेटर चोरी मागे स्थानिक काही अज्ञात लोकांचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात असून या प्रकरणी चौकशी ची मागणी होत आहे

जनरेटर चोरी प्रकरणी आश्रम शाळेतील कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात:-

कोरोना संकटात आश्रम शाळेला शासनाची परवानगी नसल्याने शाळा बंद आहे परंतु  मुख्याध्यापक यांनी  शिक्षक व कर्मचारी यांची दैनंदिन पध्दतीने एक कर्मचारी ची नियुक्ती करून आश्रम शाळेतील हजर राहण्याची सुचना केली आहे त्यानुसार दि. ३ रोजी मोरे नामक कर्मचारी यांची या दिवशी नियुक्ती होती असे असताना शाळेतून जनरेटर चोरी झाले कसे? तसेच मुख्याध्यापक यांनी जनरेटर चोरी झाल्याची तक्रार केली होती तसेच मुळ चोरीला गेलेले जनरेटर सापडले नाही? आणि  मुळ तक्रारदार नसताना वसतीगृह अधिक्षक यांनी जनरेटर सापडल्याचे पञ पोलीसांना का दिले? खरा सुञधार वाचवण्यासाठी प्रयत्न होत नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे असून आश्रम शाळेतील अधिकारी व कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात दिसून येतात तरी जनरेटर चोरी मागे नेमका कोण ? यांचा शोध घेणे पोलिसांना समोर आव्हान आहे.

 

 

 

Protected Content