आयुक्तांच्या निरोप समारंभात नगरसेवकाकडून गोमुत्र शिंपडण्याचा प्रयत्न ! (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या कार्यपद्धतीवर नगरसेवक नाराजी व्यक्त करत आले आहेत. त्याचे पडसाद त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात उमटल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

महापालिकेत आयुक्त सतीश कुलकर्णी तसेच दहा कर्मचारी व अधिकारी हे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक चेतन सनकत यांनी आयुक्त सतीश कुळकर्णी यांच्या कार्य करण्याची पद्धतीबद्दल रोष व्यक्त करण्यासाठी काळे कपडे परिधान करून गोमूत्र फवारणीची तयारी केल्याने निरोप समारंभाला गालबोट लागले. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच असे घडल्याने सर्वत्र एकच चर्चा रंगली होती. यातच जेष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करून बेत रद्द केला. आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी आज देखील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कारणे दाखवा नोटीस बजावली असून यापूर्वी देखील महापालिका कर्मचाऱ्यांवर आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी अन्यायकारक कारवाई केली असल्याचा आरोप नगरसेवक चेतन सनकत यांनी केला आहे. सातत्याने मनपा कर्मचाऱ्यांना होणार या कारवाईच्या निषेधार्थ आज महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांचा निरोप समारंभ होत असताना मनपा प्रांगणात निषेधाची काळे कपडे परिधान करून दोन वाजवत आनंदोत्सव साजरा करीत असल्याचे नगरसेवक संख्या त्यांनी सांगितले आहे

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1148660595868374

 

Protected Content