यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल-भुसावळ रोडवरील सुपरशॉपी दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न उघडकीला आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, निलेश लक्ष्मण साळुंखे (वय-४२) रा. चिंचोली ता. यावल हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. त्यांचे भुसावळ-यावल रोडवर समृध्दी सुपर शॉपी दुकान आहे. दुकान चालवून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. गुरूवार ७ एप्रिल रोजी सायंकाळी ९ वाजता ते दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान शुक्रवार ८ एप्रिल रोजीच्या मध्यरात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान सुपर शॉपीच्या मागच्या बाजूस असलेल्या दुकानाचे शटरचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून आत प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार करत असतांना सीसीटीव्हीत तीन अनोळखी चोरटे कैद झाले आहे. हा प्रकार शुक्रवारी ८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. याप्रकरणी निलेश साळुंखे यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा अज्ञात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहे.