बोरखेडा, प्रतिनिधी | प्रचार समाप्तीला केवळ एक दिवस बाकी असतांंना अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा बोरखेडा येथे झंझावाती प्रचार दौरा आज दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वा. काढण्यात आला.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2025/01/Advt-2.jpg)
बोरखेडा येथे जागोजागी अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे व जि.प. सदस्या माधुरी अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील सरपंच, ग्रा.पं. सदस्य, प्रमुख पदाधिकारी, गटातील शक्ति प्रमुख शालिक तायडे, राजू बडगुजर, बूथ प्रमुख संजय चौधरी, सुनील पाटील, ताराचंद चव्हाण तसेच गटातील इतर बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.