लग्नाचे आमिष दाखवत विवाहितेवर अत्याचार; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । पतीपासून विभक्त दिलेल्या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एकावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात २७ वर्षीय विवाहिता आई, भाऊ बहिण व तीन अपत्यांसह राहते. २००७ मध्ये मालेगाव येथील एका तरूणाशी या विवाहितेचे लग्न झाले होते. त्याना दोन अपत्य देखील आहे. लग्नानंतर विवाहितेचे राजेश भिमराव साळुंखे रा. समता नगर याच्याशी सुत जुळले. दोघांचे प्रेमप्रकरण विवाहितेच्या पतीला माहिती पडल्यानंतर दहा वर्षानंतर २०१७ मध्ये घटस्फोट दिला. त्यानंतर विवाहिता जळगावात राहू लागली. यानंतर राजेशने विवाहितेशी जवळीक साधत लग्नाचे आमिष दाखवत आणि दोन्ही मुलांना सांभाळ करेन असा विश्वास देवून विवाहितेशी एका मंदीरात विवाह केला. दरम्यान, दोघेजण भाड्याच्या खोलीत राहू लागले. दोघांपासून विवाहितेला तिसरे अपत्य झाले. त्यानंतर त्यांच्या वाद होवू लागला. राजेश साळुंखेच्या आई व भावाने राजेशला घर घेवून गेले. दरम्यान पुन्हा राजेशने विवाहितेशी जवळीक साधून तिच्यावर अत्याचार केला. व पुन्हा नवीन बसस्थानकासमोर दुचाकीवरून सोडून दिले. तेव्हापासून विवाहितेची आई व भाऊ यांना ठार मारण्याची धमकी देखील देवू लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विवाहितेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री ९ वाजता राजेश भिमराव साळुंखे रा. समता नगर याच्या विरोधात तक्रार दिली. विवाहितेच्या तक्रारीवरून रामानंद नगरपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दिपक बिरारी करीत आहे.

 

Protected Content