Home क्राईम एटीएम कार्ड बदलले, वृद्धाची ४८ हजारांची फसवणूक !

एटीएम कार्ड बदलले, वृद्धाची ४८ हजारांची फसवणूक !

0
204


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीपेठ येथील बँक ऑफ बडोदा येथील एटीएम येथे हातचालखी करून शाहू नगरातील वृध्दाचे हातातील एटीएम बदलवून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पत्नीच्या खात्यातून वेळोवेळी ४८ हजार ३०० रूपये काढून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शुक्रवारी १८ जुलै रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, सुधाकर पंडीतराव सुरसे (वय ६४ रा. शाहुनगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. १२ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता जळगावातील नवीपेठ येथील बँक ऑफ बडोदा येथील एमटीएम मध्ये पत्नीच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने हातचालकी करून वृध्दाच्या हातातील एटीएम बदलवून घेतले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने पत्नीच्या खात्यातून एटीएमच्या माध्यमातून वेळोवेळी एकुण ४८ हजार ३०० रूपये काढून फसवणूक केली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहे.


Protected Content

Play sound