अट्टल मोटारसायकल चोरटा शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात

shanipeth chor 

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीस गेलेले एक साऊंड सिस्टिमचे अॅम्पलीफायर व दोन मोटारसायकली आणि अमळनेर पो.स्टे.च्या हद्दीतून चोरीस गेलेली एक मोटारसायकल अशा चारही गुन्ह्यातील चोरट्यास शनिपेठ पोलिसांनी कंडारी, ता. भुसावळ यास अटक केली आहे. चोरीचा सुमारे एक लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

 

अधिक माहिती अशी की, पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरटा विकास उर्फ विक्की चंद्रकांत साळुंखे (वय-२५ रा. कंडारी ता.भुसावळ) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून चोरीची वाहने व समान विकत घेणारा इसरा वली अहद शेख (वय-२५ रा. चिनावल ता.रावेर) याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोघांना एक दिवस पोलीस कोठडीत देण्यात आली आहे. शनिपेठ पो.स्टे.चे पो.हे.कॉ. दिनेशसिंग पाटील,  पो.हे.कॉ. परेश जाधव, पो.ना. संदीप पाटील, पो.ना. नितीन बाविस्कर, पो.ना. अमोल विसपुते, पो.ना. अमित बाविस्कर, पो.ना. अभिजीत सैंदाणे, पो.कॉ. अनिल कांबळे ,पो.कॉ. राहुल घेटे, पो.कॉ. राहुल पाटील, पो.कॉ. मुकुंद गंगावणे, पो.कॉ. मनोज येवुलकर, चालक पो.कॉ. अखलाख शेख यांनी ही कामगिरी बजावली.

Protected Content