यावल येथे सायकलस्वाराला बेदम मारहाण हिसकावले; एकावर पोलीसात गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । यावल फैजपूर रोडवरील एका किरकोळ विक्रेत्याला मारहाण करून रोकडसह सामान असा एकुण १२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद जगन्नाथ बुरूजवाले (वय-६०) रा. बारीवाडा यावल हे शोप, चोरी आणि पुडी विक्रीचे काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. यावल शहरातील फैजपूर रोडवर ते सायकलवर आपल्या व्यवसाय करतात. रविवारी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सायकलवर विक्री करत असतांना अशोक खंडू तायडे (वय-४१) रा. डोंगरकठोरा ता. यावल हा (एमएच १९ एजी ३६०१) क्रमांकाच्या दुचाकीवर  येवून सायकलला आडवा झाला. प्रमोद बुरूजवाले यांची गच्ची पकडून बेदम मारहाण केली. प्रमोद बुरूजवाले यांच्या खिश्यातून ६ हजार ५०० रूपयांची रोकड आणि ६ हजार रूपयांचा मुद्देमाल असा एकुण १२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आला आहे. याप्रकरणी प्रमोद बुरूजवाले यांनी यावल पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अशोक तायडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अजमल पठाण करीत आहे. 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!