जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक शनिवार ३० सप्टेंबर रोजी सकाळी कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत इतर विषयांसोबत विद्यापीठ विकास व गुणवत्ता वाढीवर सांगोपांग चर्चा झाली.
या बैठकीत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा लेखा परिक्षण अहवाल व वार्षिक हिशोब पत्रकाला मान्यता देण्यात आली. हा लेखा परिक्षण अहवाल वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील यांनी मांडला त्यावर सदस्यांनी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली. या बैठकीत प्रश्नोत्तरांचा तास झाला. यामध्ये अधिसभा सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी उत्तरे दिली.
विलास जोशी, सुनील निकम, प्राचार्य डॉ. सुनील पाटील, सुरेखा पाटील, प्रा. जयवंत मगर, निशांत रंधे, अमोल मराठे, अमोल सोनवणे, दिनेश चव्हाण, भानुदास येवलेकर या सदस्यांनी सभागृहात विचारलेल्या विविध प्रश्नांना रवींद्र पाटील, प्रा. योगेश पाटील, प्रा. सुरेखा पालवे, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. एस.टी. भुकन, प्रा. एस.टी. इंगळे, ॲङ अमोल पाटील, नितीन झाल्टे यांनी उत्तरे दिलीत. बैठकीच्या प्रारंभी हरीत क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनथन, कवीवर्य ना.धों. महानोर, माजी आमदार गुलाबराव पाटील, आशाताई खरात आदींना श्रध्दांजली वाहण्यात आली.
नंदकुमार बेंडाळे जळगाव महानगरपालिकेने जळगाव रत्न पुरस्कार जाहीर केल्याबद्दल श्री. बेंडाळे यांचे अभिनंदन करण्यात आली. चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्याबद्दल इस्त्रोच्या वैज्ञानिकांचे देखील अभिनंदन करण्यात आले. आजच्या बैठकीत विद्यापीठ गुणवत्ता वाढ आणि परीक्षा गुणवत्ता वाढ या दोन विषयावर प्रत्येकी एक तास सविस्तर चर्चा झाली. विद्यापीठ गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने करीत असलेल्या प्रयत्नांची प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी माहिती दिली. तर परीक्षा गुणवत्तेबद्दल संचालक प्रा. योगेश पाटील यांनी माहिती दिली. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठाकडून विविध योजनांद्वारे गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. तणाव मुक्त व कॉपी मुक्त परीक्षा घेण्यासाठी विविध ठिकाणी कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेश पत्रावर कॉपी केल्यास कोणती शिक्षा होवून शकते याबद्दलची माहिती दिली जाणार आहे.विद्यापीठाने कौशल्य विकासासाठी ६७ ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. बहिणाबाई चौधरी स्पर्धा परीक्षा फाऊंडेशन ऑनलाईन कोर्ससाठी ८०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर विज्ञानाचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी मोबाईल सायन्स व्हॅनद्वारे तीन हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरु आहे. परीक्षा पध्दतीत काही सुधारण केल्या जातील अशी माहिती प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी दिली.
बैठकीत विविध संदर्भाने चर्चा झाली व सदस्यांनी उपयुक्त सूचना केल्या. या चर्चेत विष्णू भंगाळे, नितीन ठाकूर, अमोल मराठे, अमोल सोनवणे, स्वप्नाली महाजन, प्राचार्य एस.एन. भारंबे, प्राचार्य के.बी. पाटील, डॉ. ऋषिकेश चित्तम, डॉ. वैशाली पाटील, प्रा. संदीप नेरकर, डॉ. वर्षा पाटील, प्रा. शिवाजी पाटील, अॅङ अमोल पाटील, दीपक पाटील, मिनाक्षी निकम, प्रा. मंदा गावीत, प्रा. गजानन पाटील, सुरेखा पाटील आदींनी भाग घेतला. प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे यांची मंचावर उपस्थिती होती. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. यावेळी प्राचार्य संजय सुराणा, डॉ. राजेश जवळेकर, डॉ. एस.एस. राजपूत, प्राचार्य डॉ. अशोक खैरनार, विजय आहेर, डॉ. दिनेश पाटील, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्राचार्य सुनील पवार, प्रा. दिपीका चौधरी, प्रा. पद्माकर पाटील, प्रा. अजय पाटील, प्रा. विशाल पराते, प्रा. किर्ती कमलजा, केदारनाथ कवडीवाले, नरेंद्र नारखेडे, ॲङ केतन ढाके, जयंत उत्तरवार, नेहा जोशी, भैरवी शिरसाठ आदी उपस्थित होते.