जळगाव प्रतिनिधी । आसोदा रेल्वे गेट आज सकाळपासून दोन दिवसांसाठी बंद झाल्यामुळे येथून ये-जा करणार्या परिसरातील ग्रामस्थांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे.
रेल्वे प्रशासनाने दोन दिवसांसाठी आसोदा रेल्वे गेट बंद राहणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. यानुसार आज सकाळपासून हे गेट बंद करण्यात आले आहे. यात आसोदा आणि भादली या मोठ्या गावांसह परिसरातील तब्बल १२ गावांमधील ग्रामस्थांची ये-जा असते. आता गेटच बंद करण्यात आल्यामुळे हजारो ग्रामस्थांचे हाल होतांना दिसून येत आहेत. दोन्ही बाजूला अनेक वाहनधारक उभे असल्याचे दिसून आले. तर काही पादचर्यांनी जीव धोक्यात घालून पायी रेल्वे रूळ ओलांडण्याचा धोका पत्करला. दरम्यान, ग्रामस्थांना जळगावला येण्यासाठी पर्यायी रस्ता असला तरी त्याची अवस्था खूप खराब असल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
पहा– आसोदा रेल्वेगेट बंद असल्याबाबतचा हा वृत्तांत.