पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने कार्यकर्त्यांने जीवन संपवले

बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बीड लोकसभा मतदारसंघाची लढत यंदा चांगलीच चुरशीची झाली. या निवडणुकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे ६५५३ मतांनी पराभूत झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनावणे यांनी पंकजांना पराभूत केले. पंकजांच्या या पराभवाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पराभूत झाल्यानं लातूरच्या तरुणानं जीव दिला आहे. सचिन मुंडे असं या तरुणाचे नाव आहे. सचिन अहमदपूर तालुक्यातील येस्तार गावाचा रहिवासी होता. त्यानं पंकजा मुंडे निवडून आल्या नाहीत तर मी राहत नाही, अशी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर गेल्या तीन चार दिवसांपासून तो नैराश्यात होता. त्यानं शुक्रवारी रात्री बस खाली उडी मारुन आपलं आयुष्य संपवले.

बीड लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार याची उत्सुकता शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. प्रत्येक फेरीनंतर विजयाचं पारडं विरुद्ध बाजूला झुकत होतं. बीड लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामधील गेवराई, बीड, केज या ठिकाणी महाविकास आघडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मताधिक्य मिळाले तर परळी,माजलगाव,आष्टी या गावात महायुतीच्या पंकजा मुंडे यांना आघाडी मिळाली. या 6 पैकी 5 ठिकाणी सध्या महायुतीचे आमदार आहेत. तर फक्त बीड विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडं आहे.

Protected Content